ते दोघ तो वाद आणि बसsssss......

मी आणि ते असे आमचे धम्माल त्रिकुट (त्रिकुट म्हणायला हरकात नाही) सतत सोबत राहणारे. एकमेकांसाठी वाट्टेल ते करयला तयार अश्णारे. मात्र त्या दोघात कालांतराने मैत्री जास्त घट्ट होत गेली अन मी हरवत गेलो एकांतात. पण काय म्हणतात न जिथे खूप जवळीक असते अश्या नात्यांना नझर लगेच लागते तसच काही तरी त्यांचात घडल अन त्यात माझी मात्र सतत फरफट होत राहिली, मन द्विधा मनस्थितीत गुरफटत जात होत कारण मी फक्त उरलो होतो त्यांच्यातला दुवा, संदेशाची देवाण घेवान करणारा, मी नुसताच उदास होत होतो. तो वाद मात्र अजून चिघळत चालला होत. त्या वादाला सुरवात झली तेव्हा मात्र मी त्यांचात नव्हतो, मी आपला मजेत जगणारा, मस्त राहणारा पण एकटाच उरलो होतो. ते राहायचे सोबत शिक्षण्याच्या निमित्याने .....

मी सहज गेलो भेटायला म्हणून तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यांच्यातल अंतर, पण तेव्हा वेळ खूप निघून गेलेला होत.....

तेव्हा फार वाईट वाटलं, विचार केला काही उपाय करावा, मग खूप विचार करत बसलो अगदी मनाच्या खोलीतील प्रत्येक उपाय विचारात आणून बघितला पण उत्तर एकाच "सगळं संपलय" पण त्यांचा तो दिखावा मात्र फार सुरेख आणि काहीच न घडल्या गत वाटणारा कुणाला किंचित सुद्धा कनकन न दिसू देणारा पण मी मात्र ते न जाणता राहूच शकलो नाही ... कारण मी पण त्यांच्यातला होतो ना एक सखा, सवंगडी. मी केलेत खूप प्रयत्न समजावण्याचे पण सर्व निरर्थक आगदी समजवण्या पलीकडच वैर दाटल होत त्यांचात , मी म्हणायचो "नाती हि सरळ सुता सारखी असतात ती ताणली कि तुटणारच " पण शेवटी ती तुटलीच आणि ते मस्त, मौज करणारे, सतत हसत खिदळत वावरणारे, सर्वांची चेष्टा मस्करी करणार आमच त्रिकुट मात्र मोडल अगदी कायमच आणि खरच मैत्री ची नाती तुटली कि होणारा मनस्ताप काय आसतो हे कळल. मी मात्र दोघांशी हि सारखाच वागतोय वेळी प्रसंगी धावून सुद्धा जातोय आणि ते नाते जपताना होणारी घुसमट मी कुणाजवळ व्यक्त सुद्धा करू शक्न अशक्य.

काही काळ प्रयत्न करून मी दोघांना एकत्र आणल पण काय " एकदा सुत तुटल आणि त्यात गाठ पडली कि नात्यात अखंडत्व संपत " तसाच काही तरी घडतंय माझ्या समोर . आणि ते नात आता फक्त नाममात्र उरलाय , चाल्लय सुद्धा एका व्यहारा सारख . माझं सुद्धा तसच द्विधा मन, द्विधा विचार आणि दोघांची मन जपण्याची धडपड.. ती कधी संपेल याची मी मात्र सतत वाट बघतोय ...

- गौरव खोंड

Comments

Popular posts from this blog

तो एक बिनधास्त .....

"कुणास ठाऊक"....

एक सांज नात्याची....