"कुणास ठाऊक"....

Protected by Copyscape Online Infringement Checker
तुला माझी आठवण येत असेल कि नाही "कुणास ठाऊक"

अचानक समोरा समोर येणं
... नकळत बघून ओळख नदाखवणं
खेळ असा माझा तुझा सुरूच राहायचा वरामवार
पण हे सगळं खरा होईल काहीच नव्हतं "कुणास ठाऊक",

खेळता खेळता तुझं क्षणात रुसणं
बोलता बोलता खदखदून तुझं हसणं
अचानक दूर झाल्यानी आपल्या पदरी फक्त रडणं
पण! आनंदाचे ते दिवस तुला आठवेल कि नाही "कुणास ठाऊक",

माझी तुझी परत भेट कधी होईल का?
परत तसाच हसत खेळत आपला वेळ जाईल का?
पण! तुला मी कोण हे आठवेल कि नाही "कुणास ठाऊक",

आठवणीच्या सवल्या घेरून बसल्या मला
मी परत वळेल ही
मी परत येईल ही
मधुर त्या आठवणीत परत रमून जाईल ही
पण! तुला तुझ्या घरचं कुणी पाठवेल कि नाही कुणास ठाऊक

आयुष्यातले ते दिवस तुला आठवेल कि नाही "कुणास ठाऊक"....
तुला माझी आठवण येत असेल कि नाही "कुणास ठाऊक"
- गौरव खोंड
२२-०३-२०१२
See More
 


 

Comments

Popular posts from this blog

तो एक बिनधास्त .....

एक सांज नात्याची....