तो एक बिनधास्त .....

तो एक बिनधास्त .....


मी नेहमीच आई-बाबांच्या सावलीत वाढलेलो, माझे शिक्षण बारावी पर्यंत माझ्याच गावात झला. मी मुळात घबराट स्वभावाचा नेहमी एकाकी राहणारा , कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणारा. अगदी सर्वसाधारण कुटुंबातून अलालेलो , वडील सरकारी नौकरीत तृतीय श्रेणी वर कार्यरत होते. त्यांनी नेहमी शिकवलं कि पैसा जपून खर्च करावा आणि नवीन व्यक्तीशी पैश्याचा व्यवहार जरा जपूनच करावा. वडील फार शांत त्यांनी कधी माझ्यावर हात उगारला नाही कि कधी रागावल हि नाही. आई घरीच असायची अस माझं आयुष्य चाल्ल होत. पण ......
       आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येक व्यक्तीला याश्याच्या शोधात घर सोडव लागत, पण मला काही घराचा मोह सोडवे ना. म्हणतात ना "पक्षी एकदा मोठा झला कि त्याला नवीन घरट्यच्य शोधात जून घरट सोडव लागत" तसाच काही तरी म्हणून मला पण घर सोडव लागलं. उच्च्या शिक्षण घ्यायला बाहेत पडलो. मनात सतत घर आणि घरच होता. आई-वडलांचा मोह काही सोडवेना वाटलं जणू डोक्यावरची छाया कमी झल्या सारख वाटलं, समोर भावित्या घडवण्याची चिंता सुद्धा होती ... कारण डोळ्यात स्वप्ना होत हे सर्वसाधारण आयुष्य बदलण्याचं, एकदा विचार आला "खड्यात घाला शिक्षण आणि जा परत घरी" पण परत आई-बाबांचे ते स्वप्न आणि बस .....
          मग एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला, मी एका लहान गावातून आलेलो मोठा शहर बघून जरा घाबरलोच ... मनात भीती होती फक्त नवीन मित्र नवीन शहर आणि नवीन लोकांची. ते कसे वागतील कसे असतील हीच भीती मनाला खात होती. मी राहायची सोय केली, एक छोटी खोली केली भाड्यानी, तीच स्वरूप एकदम जोरदार अगदी एका भयाण चित्रपट सारखा. तिसर्या मजल्या वर खोली पायर्यांवर जाळेच जाळे लागलेले सगळी कडे धूळच धूळ आणि त्यात गम्मत अशी कि तिसर्या मजल्या वरून शौचा साठी खाली, मध्य रात्री जर का लागली तर अर्ध्यात दबून जावी इतकी भीती वाटयची .... असो हा तर एक विनोदाचा भाग आहे . मी फार घाबरायचो कारण सोबतीला कुणीच न्हवत घर सुद्धा पहिल्यांदाच सोडलेल.

           काही काळ राहलो घुटमळत घरच्या आठवणीत एकटाच कुढत. कालांतराने एक सोबती मिळाला वाटलं कसा असेल हा कसा वागेल आपल्याशी, पण तो खूप बडबड्या माझ्या अगदीच विरुद्ध स्वभावाचा पण माझ्याच सारखा घर पासून दूर आलेला. त्याच्या मनावर कुठलंच दडपण न्हवता कि न्हवती छाया नवीन माणसाला भेटलो याची, एकदम मनमिळाऊ. आम्ही ताशे विरोधाभासी मात्र आमची गट्टी छान जमली. तो आला आणि त्यांनी घर सोडल्याच जे दडपण होत ते कमी झालं. तो मस्तच होता जणू "बुडत्याचा आधार म्हणावा कि खचलेल्या माणसाला नवी उमेद दाखवणारा एक दुवा". शहरात वावरलेला आणि बर्याच माणसात वावरलेला म्हणून कि काय त्यानि नवीन व जुना असा कधी भेदच केला नाही. वागणूक सर्वांशी सारखी कधी एका हाकेत मदतीला धाऊन येणारा. व्यहारात चोख, निर्भीड, बिनधास्त..

      त्यानि माझं जागण पुरतच बदलून टाकलं होत. मला वाटलं प्रत्येक माझ्या सारख्या माणसाला बदलण्य करिता एक तो भेटावाच, मदमस्त, निर्भीड, बिनधास्त, मनमिळाऊ, कुणातच भेदभाव न करणारा. बदलून टाकावं सगळं विश्व आणि आयुष्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन. त्याला विसरणं कधीच शक्य नाही एव्हाना प्राण गेला तरी स्मरणात राहील असाच होत तो.

            आता तो हरवलाय काही काळ आयुष्यात येऊन माझं सर्व विश्व बदलून गेलाय जे मला कधीच जमल नसत अस वाटायच ते सहज बदलून टाकलं त्यानि. तो गेला मला सोडून पण बदलून,"तो गेला तेव्हा वाटलं का जातोय हा, आडवावा का याला" पण लक्षात आलं, याचाही एक वेगळच विश्व आहे आणि त्याला ते एका वेगळ्या मार्गांनी निर्माण करायचं स्वप्न त्याच्या मनात होत. त्याच वाटेवर मला प्रवासात एकटा सोडून, बदलून तो गेला स्वतःचा ठसा उमटउन कायमचा ठसा हसत हसत नेहमी सारखाच. हुरहूर लाऊन गेलाय कि आयुष्यात कधीतरी परत भेटावा अश्याच कठीण वळणावर मी खचलो असताना आणि परत करावी ती जादू पण परत जाऊ नये .. आता मात्र मनात त्याच्या आठवणी, त्याचा दृष्टीकोण व तो परत भेटण्याची इच्चा बाळगून जगतोय ...
                                                                                                                                     - गौरव खोंड                                                  

Comments

  1. kharach kadhi kadhi ase mitra miltat na ki tynnachya pasun dur janyachi kalpana suddha sahan hot nahi.pan pratekacha marg wegla asto ani aplyala dur jawach lagta ase lok kayam athwanit rahtat.aplyala nawyane jagayla shikawun swatah nighun jatat.mala mahit ahe bcoz mi sudhha mazya frnz pasun dur janar ahe..kahinpasun dur ahe..bt mala tuza blog phaar awdla..ayusyaht pudhe kadhitari to tula nakki milel..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"कुणास ठाऊक"....

एक सांज नात्याची....