एक सांज नात्याची....
तो उगाच उदास वाणा बसलेला, उगाच असेल का पण? नाही त्याच्या मनात असतील असंख्य प्रश्न. कारण एरवी सर्वांना घेऊन चालणारा तो आज असा का वागतोय अचानक. नक्कीच काहीं तरी बिनसलंय. मी सहज म्हणून त्याला बोललो. “कसा आहेस...” त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं, मला कळला त्या पाण्या मागचा अर्थं पण मी तरी काय करणार होतो त्याच्या साठी. पण न कळत तो बोलून गेला. "तुला माहितीये मित्रा गेली चार महिने या एकाच प्रश्नाची आस ठेऊन जगत आहे रे मी, कि एकदाच फक्त एकदा तिने म्हणावं. “कसा आहेस..” आणि मी मौनातुनच बोलावं “तुझ्या शिवाय कसा असेन..” तिने माझं मौन ओळखावं अलगद डोळ्यातल्या पाण्याला स्वतःच्या हाताने टिपाव. आणि.." 'आणि काय...' "नाही काहीच नाही." 'मोकळा झालास बोलून तर सुटशील.' "मला मघार घ्यायची नव्हतीच कधी पण..." बोलता बोलता तो अडखळला. त्याला आलेला आवंढा त्याने तितकाच शिताफीने गिळला, मी जवळ जाऊन ताच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा तोल गेला, म्हणाला "मित्रा जिवंतपणा हरवलाय रे.." मी म्हाणालो “तुझे हे प्रश्न नाही रे कळत मला, थोडा सरळ बो...
Comments
Post a Comment